Sunday with Deshpande (Season2)

ज्यांची पोटभर सोडा, एक वेळ जेवणाचीही भ्रांत असते अशा भुकेल्या लोकांचं जग तुम्ही कधी पाहिलंय? पुण्यातील कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे गिरीराज सावंत यांनी आपल्या मित्रांच्या मदतीनं फूड फॉर हंग्री अर्थात, भुकेल्यांसाठी घास हा उपक्रम सुरु केला, रोज शेकडो भुकेल्यांसाठी फूड पॅकेजेस् तयार करुन पोहोचविणारी यंत्रणा त्यांनी उभा केली आणि अनुभवांती एक विलक्षण वास्तव पुढं आलं... काय आहे, हे वास्तव? ज्यांना आपण भिकारी समजतो, त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, इंग्रजी बोलणारेही उपाशी का राहात असतील, कोणत्या गोष्टींमुळे त्यांच्यावर ही वेळ आली, आपण समाज म्हणून नेमके कुठं कमी पडतोय या व अशा अनेक अंतर्मुख करणाऱ्या संवेदनशील प्रश्नांची मालिका मग सुरु होते.  याचाच वेध घेणारा हा खास पॉडकास्ट जरुर ऐका, इतरांनाही ऐकवा आणि संवेदनशीलतेचा स्पर्श अनुभवा! 

What is Sunday with Deshpande (Season2)?

आपला भवताल अनेकांच्या अनुभवांच्या परिघात फिरत असतो. म्हणूनच, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात, आचार-विचारांत, त्याच्या संकल्पनेत एक विलक्षण गोष्ट दडलेली असते. काही गुपितं दडलेली असतात आणि आयुष्याला जिंदादिल करु पाहणारी नवी दृष्टीही दडलेली असते. संडे विथ् देशपांडे या पॉडकास्टमधून अशाच व्यक्तींसमवेत संतोष देशपांडे यांची संवादाची झकास मैफल रंगते आणि तुम्हाला आयुष्यावर आणखी प्रेम करायचं शिकवते.
रविवार आवडणाऱ्या प्रत्येकासाठी केव्हाही ऐकता येईल अशी पेशकश.