Sunday with Deshpande (Season2)

महाराष्ट्र पोलिस दलातील एक कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे राज्याचे निवृत्त विशेष पोलिस महासंचालक श्री. रवींद्र सेनगावकर हे अत्यंत वेगळ्या पठडीतील व्यक्तिमत्व. सेवानिवृत्तीनंतर सुखनैव आराम करण्याचा पर्याय असतानाही, त्यांनी राज्यातील तरुणांना पोलिस व प्रशासकीय सेवेसाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धीकदृष्ट्या तयार करण्यासाठी गुरुकुल पद्धतीने प्रशिक्षण देण्याचे ठरविले आणि त्यांचे हे स्वप्न आता सत्यात उतरले आहे. सेनगावकर गुरुकुल फाउंडेशनचे कार्य सुरु झाले. त्यांची नेमकी ही काय संकल्पना आहे, त्यातून ते काय साध्य करु पाहाताहेत, अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना त्यांना काय सांगावेसे वाटते या सर्व बाबींची उलगड खुद्द सेनगावकरांनीच संतोष देशपांडे यांसमवेतच्या या पॉडकास्टमधून केली आहे. 

What is Sunday with Deshpande (Season2)?

आपला भवताल अनेकांच्या अनुभवांच्या परिघात फिरत असतो. म्हणूनच, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात, आचार-विचारांत, त्याच्या संकल्पनेत एक विलक्षण गोष्ट दडलेली असते. काही गुपितं दडलेली असतात आणि आयुष्याला जिंदादिल करु पाहणारी नवी दृष्टीही दडलेली असते. संडे विथ् देशपांडे या पॉडकास्टमधून अशाच व्यक्तींसमवेत संतोष देशपांडे यांची संवादाची झकास मैफल रंगते आणि तुम्हाला आयुष्यावर आणखी प्रेम करायचं शिकवते.
रविवार आवडणाऱ्या प्रत्येकासाठी केव्हाही ऐकता येईल अशी पेशकश.