Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा

कस्टमरला काय हवे, हे महत्त्वाचे आहेच, पण त्याला जे हवे आहे त्यात आपण आणखी चांगले काय देऊ शकतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. काही नवी फंक्शन्स आपण वाढवू शकतो का, काही सोपी प्रोसेस देऊ शकतो का? कस्टमरच्या ठिकाणी स्वतः उभे राहिलो, की आपल्याला नवनवे पर्याय सूचत जातात. त्यातून व्यवसाय वाढतो. 

What is Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा?

तुला काय कमी आहे? तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी हे सारे उभे करुन ठेवलेले आहे, तुला फक्त सांभाळायचे आहे...`` बोलणारा सहज बोलून जातो आणि आपल्या उद्योगातील नवनवी आव्हाने पेलणाऱ्या नव्या पिढीतील उद्योजकाच्या मनाला ती बोच लागते. आधीच्या पिढीने पाया मजबूत केलेला असतो आणि नव्या पिढीला त्यावर उत्तुंग इमारत उभी करायची असते. कसा असतो हा प्रवास? प्रसिद्ध प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून साकारलेली ही संग्राह्य यशोगाथा.