Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा

`पेक्टिन` भारतात फक्त जळगावमध्ये तयार होते. जॅम-जेलीपासून औषधांपर्यंत असंख्य ठिकाणी याचा वापर होतो. डॉ. कृष्णा पाटील यांनी हा उद्योग उभारला आणि आता चेतन व दीपक तो पुढे नेत आहेत. प्रॉडक्टबरोबरच सोल्यूशन्ससुद्धा ग्राहकाला दिली पाहिजेत, हे धोरण ठेवून ते कार्यरत असतात. 

What is Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा?

तुला काय कमी आहे? तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी हे सारे उभे करुन ठेवलेले आहे, तुला फक्त सांभाळायचे आहे...`` बोलणारा सहज बोलून जातो आणि आपल्या उद्योगातील नवनवी आव्हाने पेलणाऱ्या नव्या पिढीतील उद्योजकाच्या मनाला ती बोच लागते. आधीच्या पिढीने पाया मजबूत केलेला असतो आणि नव्या पिढीला त्यावर उत्तुंग इमारत उभी करायची असते. कसा असतो हा प्रवास? प्रसिद्ध प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून साकारलेली ही संग्राह्य यशोगाथा.