Sunday with Deshpande (Season2)

मुंबईतील शरद कुलकर्णी यांनी वयाच्या ६०व्या वर्षी जगातील सर्वात उंच पर्वतशिखर माउंट एव्हरेट केले. असे करणारे ते पहिले भारतीय ज्येष्ठ नागरिक ठरले. त्यांची जिद्द, ध्येयासक्ती यामुळे हे शक्य झाले असले तरी त्यांच्या या यशाला एक हळवी, वेदनामय किनार आहे. एव्हरेट शिखर सर करण्याच्या पहिल्या प्रयत्नांत त्यांना सोबत असलेल्या आपल्या प्रिय पत्नीस गमवावे लागले. पुन्हा जिद्दीने ते उभे राहिले आणि तिच्या स्मृतिंना उराशी जपत ही मोहीम  फत्ते केली आणि तिचं तिथं स्मारकही रोवलं.  थरारक, रोमांचक आणि तितकीच हळवी अशी ही एव्हरेट मोहीम कशी घडली, ऐकूया `संडे विथ् देशपांडे`च्या या विशेष भागामध्ये संतोष देशपांडे यांसमवेत खुद्द त्यांच्याच शब्दांत. प्रेरणादायी अशी ही दास्तान खुद्द एव्हरेस्टलाही हळवी करुन जाते. जरुर ऐका आणि इतरांनाही आवर्जून ऐकवा. 

What is Sunday with Deshpande (Season2)?

आपला भवताल अनेकांच्या अनुभवांच्या परिघात फिरत असतो. म्हणूनच, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात, आचार-विचारांत, त्याच्या संकल्पनेत एक विलक्षण गोष्ट दडलेली असते. काही गुपितं दडलेली असतात आणि आयुष्याला जिंदादिल करु पाहणारी नवी दृष्टीही दडलेली असते. संडे विथ् देशपांडे या पॉडकास्टमधून अशाच व्यक्तींसमवेत संतोष देशपांडे यांची संवादाची झकास मैफल रंगते आणि तुम्हाला आयुष्यावर आणखी प्रेम करायचं शिकवते.
रविवार आवडणाऱ्या प्रत्येकासाठी केव्हाही ऐकता येईल अशी पेशकश.