Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा

शाकाहार, मांसाहार, मत्साहार, एगेटेरियन या साऱ्या संकल्पना आपापल्या पातळीवर मोलाच्या आहेतच. शास्त्रीय पद्धतीने विचार केला, तर शरीराला आवश्यक घटक ज्यातून पुरेशा प्रमाणात मिळतात, तो आहार परिपूर्ण गणला जातो. `ॲक्वाकल्चर`च्या माध्यमातून आरोग्य आणि बाजारपेठ या दोन्हींवरही सकारात्मक परिणाम साधता येतो. 

What is Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा?

तुला काय कमी आहे? तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी हे सारे उभे करुन ठेवलेले आहे, तुला फक्त सांभाळायचे आहे...`` बोलणारा सहज बोलून जातो आणि आपल्या उद्योगातील नवनवी आव्हाने पेलणाऱ्या नव्या पिढीतील उद्योजकाच्या मनाला ती बोच लागते. आधीच्या पिढीने पाया मजबूत केलेला असतो आणि नव्या पिढीला त्यावर उत्तुंग इमारत उभी करायची असते. कसा असतो हा प्रवास? प्रसिद्ध प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून साकारलेली ही संग्राह्य यशोगाथा.