गुरुप्रबोध नवनीत (GuruPrabodh Navneet)

आज प्रजासत्ताक दिन. त्यानिमित्त सर्व देशबांधवांना शुभेच्छा. कोणत्याही राष्ट्राच्या जडणघडणीत सर्वात महत्त्वाचा वाटा असतो शिक्षणाचा. आजच्या शिक्षणपद्धतीवर तुम्ही पूर्ण समाधानी आहात का,असा प्रश्न विचारला तर बहुतेक लोकांचे उत्तर नकारार्थी असते. मग, कोणती शिक्षण पद्धती आपले समाधान करू शकते, यावर पूज्य सद्गुरुदास महाराज जेव्हा मार्गदर्शन करतात, तेव्हा ते चिंतन मनातील विचारांना अधिक प्रगल्भ करते...हे विचारांचे अनमोल धन मनात जपा आणि मनोमनी पोहोचावा...ही देखील देशाच्या प्रगतीसाठी आपले मोलाचे योगदान ठरू शकते.

Creators & Guests

Producer
Santosh Deshpande

What is गुरुप्रबोध नवनीत (GuruPrabodh Navneet) ?

परमपूज्य सद्गुरुदास महाराजांच्या विचारपुष्पांची गुंफण म्हणजे गुरुप्रबोध नवनीत. अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत विविध विषयांवरती पू. सद्गुरुदास महाराज यांनी मांडलेले विचार या माध्यमातून आपल्या थेट हृदयास भिडतात. अध्यात्माचा खरा अर्थ उलगडणारी ही पॉडकास्ट मालिका त्यातील विचारांच्या माध्यमातून आपल्या जीवनास नवा आशय देईल, यात शंका नाही.