Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा

आर्किटेक्चरचे विश्व खूपच वेगळे असते. घरांची रचना हा त्यातील खूप छोटा भाग. आपल्यामधील सृजनशीलता, प्रयोगशीलता यांची मांडणी म्हणजे आर्किटेक्चर, ही संकल्पना मांडत शब्द, छायाचित्र आणि आर्किटेक्चर यांच्यासह क्षितिज महाशब्दे व जान्हवी म्हात्रे हे करीत असलेली आगळी संयुक्त वाटचाल लक्षणीय ठरत आहे. 

What is Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा?

तुला काय कमी आहे? तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी हे सारे उभे करुन ठेवलेले आहे, तुला फक्त सांभाळायचे आहे...`` बोलणारा सहज बोलून जातो आणि आपल्या उद्योगातील नवनवी आव्हाने पेलणाऱ्या नव्या पिढीतील उद्योजकाच्या मनाला ती बोच लागते. आधीच्या पिढीने पाया मजबूत केलेला असतो आणि नव्या पिढीला त्यावर उत्तुंग इमारत उभी करायची असते. कसा असतो हा प्रवास? प्रसिद्ध प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून साकारलेली ही संग्राह्य यशोगाथा.