Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा

डाईज आणि टुल्सची निर्मिती व त्याआधारे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी प्लॅस्टिक मोल्डिंगचे विविध पार्टस् यांची निर्मिती करणारा एक छोटा उद्योग जेमतेम चार दशकांत देशातील सहा ठिकाणी युनिटस् आणि सुमारे ३०० कोटी रुपयांची उलाढाल या टप्पांवर पोहोचला. नरेश राऊत यांनी मोठ्या कष्टांतून फुलवलेला हा उद्योग त्यांची मुले निखिल आणि अभिजित यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. त्याची ही विलक्षण कहाणी. 

What is Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा?

तुला काय कमी आहे? तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी हे सारे उभे करुन ठेवलेले आहे, तुला फक्त सांभाळायचे आहे...`` बोलणारा सहज बोलून जातो आणि आपल्या उद्योगातील नवनवी आव्हाने पेलणाऱ्या नव्या पिढीतील उद्योजकाच्या मनाला ती बोच लागते. आधीच्या पिढीने पाया मजबूत केलेला असतो आणि नव्या पिढीला त्यावर उत्तुंग इमारत उभी करायची असते. कसा असतो हा प्रवास? प्रसिद्ध प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून साकारलेली ही संग्राह्य यशोगाथा.