Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स २ः उद्यमी `नेक्स्टजेन`चा परिणामकारक प्रवास

कोरोनाच्या साठीचा काळ अनेक आव्हाने घेऊन आला पण त्याने काही नव्या संधीही समोर आणल्या. छत्रपती संभाजीनगर येथील विजय गियर्स या उद्योगासाठी आणि विजय दिगंबर मुळे या नेक्स्टजेन उद्योजकासाठी हा काळ आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने आणि आपल्या उत्पादनांच्या निर्यातीच्या बाबतीत अत्यंत मोलाचा ठरला. एकीकडे त्यांनी आपल्या वडिलांच्या सहकार्याने अद्ययावत रोबोटिक मशीन्सच्या माध्यमातून उत्पादनक्षमतेत भरीव वाढ केली आणि दुसरीकडे परदेशी बाजारपेठेत जम बसविण्यासाठी ठोस पावले उचलली.

What is Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स २ः उद्यमी `नेक्स्टजेन`चा परिणामकारक प्रवास?

पहिल्या पिढीत उद्योगाचा पाया रचला जातो खरा, मात्र त्यावर उत्तुंग इमारत बांधण्याचे आव्हान पुढील पिढीतील उद्योजकांपुढे असते. हे आव्हान ते कसे पेलतात, त्यांचा उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा विकसित होतो, नवीन्याची ओढ असतानाच अनुभवातून आलेल्या ज्ञानाची जोड कशी मिळते अशा अनेक गोष्टींची उलगड त्यांच्याकडूनच होते, तेव्हा त्यातील सच्चेपणा अधिक बोलका असतो. म्हणूनच, प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांमधून साकारलेल्या `मूव्हिंग ॲस्पिरेशन` मालिकेचा हा दुसरा भाग ऐकणं हा एक समृद्ध करणारा अनुभव ठरतो.