Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा

`आयएचएम अहमदाबाद`मधून हॉटेल मॅनेजमेंट शिकून बाहेर पडलेल्या तरुणाने स्वतःसाठी नोकरी शोधायची नसते. त्याने आपल्या कर्तृत्वाने रोजगार निर्माण करायचा असतो. त्यातही, घरात हॉटेलची परंपरा असलेल्या वारसदाराने तर आणखी मोठ्या विस्ताराची स्वप्ने पाहायची आणि साकारायची असतात...

What is Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स... `नेक्स्टजेन`च्या २५ परिणामकारक कथा?

तुला काय कमी आहे? तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी हे सारे उभे करुन ठेवलेले आहे, तुला फक्त सांभाळायचे आहे...`` बोलणारा सहज बोलून जातो आणि आपल्या उद्योगातील नवनवी आव्हाने पेलणाऱ्या नव्या पिढीतील उद्योजकाच्या मनाला ती बोच लागते. आधीच्या पिढीने पाया मजबूत केलेला असतो आणि नव्या पिढीला त्यावर उत्तुंग इमारत उभी करायची असते. कसा असतो हा प्रवास? प्रसिद्ध प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून साकारलेली ही संग्राह्य यशोगाथा.