Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स २ः उद्यमी `नेक्स्टजेन`चा परिणामकारक प्रवास

`न्यूरोसायन्स ` हा अत्यंत गहन विषय. त्याचे अनेक पैलू वैद्यकक्षेत्रात कौशल्याचे मानले जातात. मोठ्या शहरांतील संधी सोडून एकेकाळी सोलापूरसारख्या शहरात या क्षेत्रातील प्रॅक्टीस सुरु करणाऱ्या डॉ. गिरीष वळसंगकर यांची पुढची पिढी डॉ. अश्निन व डॉ. शोनाली यांच्या आश्वासक नेतृत्वाखाली  रुग्णसेवेत रममाण आहे. आपल्यातील १०० टक्के रुग्णांना देत असताना प्रसंगी स्वतःला तोशीष लागली तरी चालेल, अशा उदात्त भावनेतून सुरु असलेली त्यांची ही सेवा त्यांना वैद्यकक्षेत्राबरोबरच मानवतेच्या कसोटीवरही वरच्या स्तरावर पोहोचवते. 

What is Moving Aspirations मूव्हिंग ॲस्पिरेशन्स २ः उद्यमी `नेक्स्टजेन`चा परिणामकारक प्रवास?

पहिल्या पिढीत उद्योगाचा पाया रचला जातो खरा, मात्र त्यावर उत्तुंग इमारत बांधण्याचे आव्हान पुढील पिढीतील उद्योजकांपुढे असते. हे आव्हान ते कसे पेलतात, त्यांचा उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा विकसित होतो, नवीन्याची ओढ असतानाच अनुभवातून आलेल्या ज्ञानाची जोड कशी मिळते अशा अनेक गोष्टींची उलगड त्यांच्याकडूनच होते, तेव्हा त्यातील सच्चेपणा अधिक बोलका असतो. म्हणूनच, प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांमधून साकारलेल्या `मूव्हिंग ॲस्पिरेशन` मालिकेचा हा दुसरा भाग ऐकणं हा एक समृद्ध करणारा अनुभव ठरतो.